शरद गांगलेंचे स्वैच्छिक रक्तदान

| अलिबाग | वार्ताहर |

जागतिक रक्तदाता सप्ताह निमित्ताने मंगळवारी (दि.25) महाडचे शरद गांगल यांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्रात आपले 143वे रक्तदान केले रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान ही सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी आजपावेतो वेगवेगळ्या रक्तकेंद्रात 142 वेळेस स्वैच्छिक रक्तदान केले आहे. या स्वैच्छिक रक्तदानाबद्दल राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वार्षिक कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले होते. मंगळवारी जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्रातर्फे पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version