सोनिया गांधींवर धावून जाण्याचा प्रकार दुर्दैवी; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

। मुंबई । प्रतिनिधी ।
संसदेत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींचा अवमान झाल्याच्या मुद्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये जो काही वादंग झाला तो दुर्दैवीच होता. त्यावरुन सोनिया गांधी यांच्या अंगावर सबंध सभासद धाऊन आले. अगदी मंत्रिमंडळात असलेले मंत्रीही धावून आले. यातून काही वेगळा प्रकार होण्याची शक्यता होती,असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी ट्टिटरच्या माध्यमातून केला आहे. पवार यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत घडलेल्या प्रकाराबद्दल ट्विटरवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार ट्विटमध्ये म्हणाले की, लोकशाहीत वेगवेगळी मत असतात. त्या मताशी शंभर टक्के तुम्ही सहमत होता, असे नाही. हे जरी खरे असले तरी मत ऐकण्याची भूमिका घ्यावी लागते. मात्र ते चित्र दिसत नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या खासदारांकडून एक शब्द चुकीचा गेला ही चूक होती. चूक लक्षात आल्यावर त्यांनी माफी मागितली. मात्र हट्ट काय केला, तर जो बोलला त्याबद्दल कोणी काही बोलले नाही तर सोनिया गांधींनी माफी मागावी.

पवार पुढं म्हणाले की, विधान केलं दुसर्‍याने आणि माफी तिसर्‍याकडून मागता. त्याबाबतीत सभागृह थांबल्यावर , सोनिया गांधी यांनी एका भाजपच्या ज्येष्ठ महिला खासदारांना माझ्यावर हल्ला का होतोय, माझ्याकडून माफी का मागितली जातेय असे विचारले तर त्यांच्या अंगावर सबंध सभासद धाऊन आले. अगदी मंत्रिमंडळात असलेले मंत्रीही धावून आले. यातून काही वेगळा प्रकार होण्याची शक्यता होती. सुदैवाने राष्ट्रवादीच्या खासदारांनी सोनिया गांधीना तिथून बाहेर काढले. हे झालं नसतं तर सदनामध्ये एक भीषण चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. सबंध जगात भारताची नाचक्की झाली असती, असंही पवार यांनी म्हटलं.

Exit mobile version