शरद पवार यांची प्रकृती बिघडली

| पुणे | वृत्तसंस्था |

रविवारी (दि.5) शरद पवारांनी तीन मोठ्या सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीतली सभा संपेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. घसा बसल्याने त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरही प्रचंड थकवा जाणवत होता. यानंतर त्यांनी गोविंदबाग या ठिकाणी जाऊन आराम केला. आजचे त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रविवारी रात्री शरद पवार गटाने ही घोषणा केली.

Exit mobile version