काय होईल, आज सांगता येत नाही
| बारामती | वृत्तसंस्था |
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध समुदायांकडून आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेने आरक्षणासाठी उपोषण केले. राज्य सरकारने त्यांना मुदत वाढवून देऊन प्रश्न सोडवण्याचा विश्वास दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळते, त्यांच्यातला वाटा अन्य कुणी घेऊ नये, अशी अपेक्षा ओबीसींची आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागणार आहे.
दुसऱ्या कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही. या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा विश्वासही शिंदे सरकारने दिला आहे. आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते? हे पुढच्या 30-35 दिवसांत दिसेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर काय होईल, हे आज सांगता येत नाही, असे सूचक विधान शरद पवार यांनी बारामती येथे केले.
एकवाक्यतेसाठी प्रयत्न करणार
निवडणुका येतील तेव्हा काही जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न येतात, तेव्हा त्या राज्यात ज्यांचा रस नाही, अशांना तिथे पाठवून त्या मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. अद्याप ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. येत्या दहा दिवसात मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस व इतर पक्षीय नेत्यांशी चर्चा करून यावर वाद होऊ नये, याची काळजी घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले.