अजित पवारांच्या पुतण्यावर चार वर्षांपूर्वी दिली होती ‘ही’ जबाबदारी; युगेंद्र पवार म्हणाले..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन त्यांचा पक्षदेखील बळकावला आहे. आता एक नवीन खेळी शरद पवार गटाकडून केली जातेय. खुद्द अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजितदादांशी दुरावा करुन शरद पवारांशी जवळीक साधली आहे. युगेंद्र पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत मागच्या चार वर्षांपासून काम करत असल्याचं सांगितलं. शरद पवारांनी त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीबद्दलही त्यांनी खुलासा केला.
”निवडणुकीसाठी एक महिना आहे, त्यामुळे काय निर्णय घ्यायचा हे नंतर बघूया. मी राजकारणात नसतानाही ग्राऊंड लेव्हला काम करत आलेलो आहे. जे करत आलेलो आहे तेच पुढेही करत राहणार आहे. शरद पवार म्हणतील तसंच पुढे काम करत राहणार.” असं युगेंद्र यांनी स्पष्ट केलं.







