। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी गुणाजी भालेकर यांच्या पत्नी शारदा भालेकर यांचे बुधवारी (दि.2) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी वरसगाव, आंबेवाडी, कोलाड, डोळवहाल खांब, देवकान्हे, रोहा, लांढर बोरघर, वाशी, इंदापूर, माणगाव, मुबंई इत्यादी विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, एक मुलगा, चार मुली, जावई, सून, दिर, जाऊबाई, पुतणे, पुतण्या, नातवंडे व मोठा भालेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तर कार्य शुक्रवारी (दि.10) मौजे चिल्हे येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.