शारदा स्कुलचे जिल्हा क्रीडा स्पर्धेत यश

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुका क्रीडा सप्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याने रायगड जिल्हा क्रीडा स्पर्धेच्या जिल्हा निवड मध्ये उतरलेल्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 61किलो वजनी गटातवैष्णवी गंगावणे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरावरील स्पर्धात स्थान मिळवले. कु.आर्या शिंदे हिने भारोततोलन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत शाळेतील आयुष शिंदे, मानसी कुंभार, सानिका धुळे, वंदना राजपुरोहीत हे विद्यार्थी विजयी होऊन त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. नेरळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत शाळेतील मुले व मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. तर तालुक्यातील गीता घारे हायस्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अथर्व शितोळे याने सुवर्णपदक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या क्रिडा प्रमुख धनश्री कानडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version