। रेवदंडा । वार्ताहर ।
मांडळा सुदर्शन सहकारी भात गिरणी तथा खरेदी विक्री संघाच्या पदाधिकारी निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बाबटा फडकला आहे. यानिमित्ताने नवनिर्वाचीत चेअरमन शशिकांत परावे तथा अन्य सभासदांचा सत्कार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधानसभा आमदार जयंतभाई पाटील यांच्याहस्ते करण्यात शेतकरी भवन, अलिबाग येथे करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन यांच्यासह व्हाईस चेअरमन रफाईल वेगस्, सभासद संतोष कांबळी, प्रदिप धनावडे, शेकाप मुरूड तालुका सहचिटणीस सी.एम.ठाकूर, मंगेश थळे, मनोहर मेहत्तर, रवी मेहत्तर आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
मांडळा सुदर्शन सहकारी भात गिरणी तथा खरेदी विक्री संघ या सहकारी संस्थेच्या निर्वाचनाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या शिलेदारांनी हा गड राखल्याबद्दल आनंदाचा जल्लोेष केला.
या विजयानंतर या शिलेदारांनी पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी जयंतभाई यांनी शाब्बासकीची थाप देत, संपादित केलेल्या यशाबद्दल नवनिर्वाचीत पदाधिकारी, सभासद तसेच पक्षाचे कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे.