| अलिबाग | प्रतिनिधी |
नुकत्याच श्री शिवदत्त मंदिर चौल, आंबेपूर येथे संपन्न झालेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये मुरुड तालुक्यातील नांदगाव सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या. रांगोळीकार क्षितिज निशिकांत मळेकर याने दुबई एअर शो दरम्यान तेजस अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय वायू सेनेचे शूर वैमानिक विंग कमांडर नामांश स्याल यांना अर्पण केलेली हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहण्यासाठी साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आकाशात झेप घेणाऱ्या त्यांच्या स्वप्नांचा आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा साक्षीदार म्हणजे ही रांगोळी तसेच खाली प्रज्वलित दिवा त्यांच्या अमर स्मृतीचा, शौर्याचा आणि राष्ट्रभक्तीच्या अखंड तेजाचं प्रतीक असल्याचे रांगोळीकार क्षितिजने सांगितले, काही दिवसांपूर्वी रेवदंडा येथील कालभैरव मंदिरामध्ये कालभैरव जयंतीनिमित्त क्षितिजने साकारलेल्या एका स्त्रीच्या पाण्यातील प्रतिबिंबाची रांगोळी पाहून दर्शक अवाक झाले होते, या त्याच्या कौतुकात्मक कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







