आंबेवाडी नाक्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या

विभागीय पोलीस निरिक्षकांकडे गार्‍हाणे

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावर थांड मांडून बसलेले असतात. यामुळे काही जनावरे आपघाताला सामोरे जातात तर काही जनवरांच्यामुळे आपघात घडून वाहन चालक व प्रवासी जखमी होत असतात. यामुळे गेली अनेक दिवस येथील ग्रामस्थ या समस्येबाबत आक्रमक झाले होते.

दिवसेंदिवस मोकाट गुरांच्यात होत असलेली वाढ, याचबरोबर वाढते आपघात तसेच ही गुरे रात्री-अपरात्री कुठेही उभी असतात. यामुळे काही गुरांना अवजड वाहनांच्या धडकेने अपघात होऊन जखमी होतात तर काही जागीच मृत्यू पावत असल्याच्या घटना घडत आहेत. काहीवेळा दुचाकीस्वार यांना धडक बसल्याने ते देखिल जखमी होत आहेत. या मोकाट गुरांचे मालक कोण आहेत, याचा थानपत्ता नाही. परंतु, यातच मार्गाचे रुंदीकणाचे काम सुरू असून यात राष्ट्रिय महामार्ग म्हणून वाहतुकीचे प्रमाण देखिल अधिक असल्याने यावर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी यावेळी कोलाड पोलिस प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ तसेच विविध सामजिक संघटना पत्रकार यांनी शनिवारी (दि.28) विभागीय पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांची भेट घेऊन सार्‍या समस्यांचे गार्‍हाणे मांडत यावर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे रोहा तालुका उपप्रमुख चंद्रकांत लोखंडे, प्रफुल बेटकर, विष्णू महाबळे, विजय शिंदे, महेश जंगम, श्याम लोखंडे, विश्‍वास निकम, तेजपाल जैन, परदेशीसह कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ, विविध संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

कोलाड आंबेवाडी नाका तसेच परीसरात मोकाट गुरांच्या संख्येत भयानक वाढ झाली आहे. यामुळे ही गुरे-ढोरे रस्त्यावर येऊन आपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तर, दुसरीकडे आपघात देखील घडत आहेत. तसेच, त्यांचे मालक कोण आहेत, ती कोणत्या गावातील आहेत, याचा पत्ता नाही. मात्र, दुर्दैवाने त्यांचा अंत झाला तर मनाला खूप वेदना होत असल्याने यांना नजीकच्या गो शाळेत अथवा त्यांचे मालक शोधून त्यांना त्यांच्या ताब्यात देणे.

चंद्रकांत लोखंड,
सामाजिक कार्यकर्ते

कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ तसेच या परिसरातील विविध संघटना, पत्रकार यांनी मुंबई-गोवा महामार्गावर विशेषतः कोलाड आंबेवाडी नाक्यावर मुख्य चौक व परिसरात मोकाट गुरांचा कळप थांड मांडून बसलेले असतात. तसेच, मुख्य मार्गावर आल्याने आपघातास कारणीभूत ठरत आहेत. अधिक आपघात समस्येत वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून यावर उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, गाव स्तरांवर बैठका घेऊन मालकांचा शोध घेऊन काही दिवसांत यावर तोडगा काढू.

नितिन मोहिते,
पोलिस निरिक्षक
Exit mobile version