| पेण | प्रतिनिधी |
खारेपाट विभागातील दिवस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कै.जयप्रकाश रामभाऊ ठाकूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मंगळवारी सकाळी दिवस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या अंतीम यात्रेत सर्व राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव दिवेकर, प्रभाकर म्हात्रे, सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे, उपसभापती नितीन पाटील, वाशी सरपंच गोरखनाथ पाटील, बोर्झे सरपंच विजय ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक के.डी.म्हात्रे, मसद सरपंच हरीचंद्रभाऊ पाटील, संजय ठाकूर, वाशी शेकाप जेष्ठ कार्यकर्ते दिपक पाटील, शेकापचे वाय.के.पाटील तसेच विविध सामाजिक सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, पत्रकार सहभागी झाले होते. जयप्रकाश ठाकूर यांच्या राजकीय क्षेत्रातील कारकीर्द व धडाडी याबाबत अनेक मान्यवर मंडळींनी मनोगत व्यक्त केले. शेवटी अनेक मान्यवर नेते मंडळींनी पुष्पहार अर्पण करून या लढवय्या नेत्याला अखेरचा लाल सलाम केला.







