उरणमधील वीज पुरवठ्याबाबत शेकाप आक्रमक

पुरोगामी युवक संघटनेतर्फे निवेदन
। उरण । वार्ताहर ।
गेले काही दिवस उरण तालुक्यात वीजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेकाप पुरोगामी युवक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी (दि.12) याबाबतचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनावणे यांना दिले.

यावेळी उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, महिला तालुका अध्यक्षा सीमा घरत, विकास नाईक, दत्ता घरत, महेंद्र ठाकुर, संतोष ठाकुर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उरण तालुक्यात सतत होणार्‍या भारनियमन संदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी येत्या आठ दिवसांत भारनियमन कमी होईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र आठ दिवसांत हा प्रश्‍न न सुटल्यास कार्यालयासमोर उपोषणास करण्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी रमाकांत म्हात्रे यांनी दिला आहे.

Exit mobile version