| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
चेंढरे जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून, आक्षी ग्रामपंचायत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी मतदार जनतेने शेकाप-महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आश्वासन दिले आहे.
रायगड जिल्ह्यात शेकाप-महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा मोठा झंझावात सुरू आहे. दरम्यान, चेंढरे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रविणा घासे आणि आक्षी पंचायत समितीचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील आक्षी व साखर परिसरात शुक्रवारी (दि.30) दिवसभर प्रचार केला. आक्षी गावात शेकापने मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. ‘शेकाप नाही तर विकास नाही’, अशी परिस्थिती सध्या आक्षी गावाची आहे. त्याची जाणीव दोन्ही उमेदवारांनी येथील जनतेला करून दिली. तसेच, त्यांचे प्रश्न व मागण्या ऐकून त्यावर 100 टक्के तोडगा काढून ते पुर्णत्वास नेण्याचे आश्वासन शेकाप-महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिला. त्यानंतर शनिवारी (दि.31) रायवाडी येथील पांडबादेवी मंदिरात देवीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरूवात केली. यावेळी देखील रायवाडीतील जनतेमधून उमेदवार प्रविणा घासे आणि प्रफुल्ल पाटिल यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रचारादरम्यान उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. यावेळी आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील मतदार जनतेने शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी उमेदवार प्रविणा घासे, प्रफुल्ल पाटील यांच्यासह शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, आक्षी सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य रश्मी वाळंज, निरजा नाईक, विनायक पाटील, माजी सरपंच नंदकुमार वाळंज, माजी जि.प. सदस्या आश्लेशा नाईक, शेकाप कार्यकर्ते विलास राणे, रमण पाटील, उल्हास भाटे, शेषनाथ बानकर, कुमार बानकर, अभिजीत वाळंज, संतोष राऊळ, नितिन सारंग, प्रियंका वाळंज, रंजना बानकर यांच्यासह आक्षी ग्रामपंचायत व चेंढरे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.







