जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शेकाप कटिबद्ध

चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन; कोळगाव येथील नळपाणी योजनेचे उद्घाटन
। अलिबाग । वार्ताहर ।
ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकर पाटील यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे चालविण्याचे काम आमची पिढी करत आहे. मूलभूत विकासकामांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शेकाप कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. ग्रुप ग्रामपंचायत सासवणेतर्फे आयोजित कोळगांव वैयक्तिक नळपाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. रविवारी (दि.23) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी जिल्हा सहचिटणीस शेकाप शंकरराव म्हात्रे, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, कोळगावचे सरपंच संतोष गावंड, कोळगाव उपसरपंच सुष्मा नाखवा, तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्या संजना पाटील, आश्‍विनी भगत, वैशाली थळ, सदस्य सोमनाथ म्हात्रे उपस्थित होते. यापुढे मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले कि, सर्व गावकर्‍यांनी शेकापवर केलेले प्रेम कायम लक्षात ठेवू. शेकापच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे म्हणजे उपकार नसून प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. भविष्यात शेकापच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येतील. याशिवाय आधुनिक काळाची गरज म्हणून शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version