महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फुर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार जल्लोषात सुरु आहे. प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. गृह भेटीतून मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केले जात आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारात शेकाप व काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आळे.
महाविकास आघाडातील शेकाप व काँग्रेसचे थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षया नमिता प्रशांत नाईक, नगरसेवकपदासाठी प्रभाग एकमधून संतोष मधूकर गुरव, संध्या शैलेश पालवणकर. प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील. प्रभाग तीनमधून साक्षी गौतम पाटील, आनंद अशोक पाटील, प्रभाग चारमधून रेश्मा मनोहर थळे, महेश वसंत शिंदे. प्रभाग पाचमधून निवेदिता राजेंद्र वाघमारे, समिर मधूकर ठाकूर. प्रभाग सहामधून ऋषीकेश रमेश माळी, अश्वीनी ठोसर. प्रभाग सातमधून ॲड. मानसी संतोष म्हात्रे, अभय म्हामुणकर. प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे, अनिल चोपडा. प्रभाग नऊमधून योजना प्रदिप पाटील, सागर शिवनाथ भगत. प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत, वृषाली महेश भगत हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
छाननी झाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रत्येक प्रभागातील महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवांरांनी प्रत्यक्ष मतदारांना भेटून खटारा आणि हाताचा पंजा चिन्हा समोर बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचाराचा झंझावात पहावयास मिळाला. अलिबाग शहराला राजकिय, सामाजिक वारसा असलेल्या अक्षया नमिता प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून तरुणाईला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रचाराच्या दरम्यान अक्षया नाईक यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचाराचा कालावधी संपण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु असून शहरामध्ये प्रचार वेगाने सुरू आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक, प्रभाग सहामधील नगरसेवक पदाचे उमेदवार ॲड.अश्वीनी ठोसर व ॲड. ऋषीकेश माळी, यांचा गुरुवारी सायंकाळी ब्राह्मणआळी परिसरात प्रचार करण्यात आला. श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. सिध्दीविनायक, ओमसागर, सुतारवाडा, मोघे खानावळ अशा अनेक भागात गृह भेटी घेऊन प्रचार करण्यात आला. खटारा चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले. यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, ऋषीकेश ठोसर, प्रमोद झुंजारराव, देवेंद्र मानकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रभागात प्रचार जोमाने सुरु असल्याचे दिसून आले.
