| खारेपाट | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील माणकुळे येथे शेकाप व महाविकास आघाडीचे शहापूर मतदार संघातील जिल्हा परिषदेचे उमेदवार अभिषेक पाटील व वैजाळी पंचायत समितीचे उमेदवार सुशील पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नारंगीचा टेप येथे करण्यात आला. तसेच, माणकुळे येथील हनुमान मंदीर व बहिरीचा पाडा येथील श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रचारादरम्यान नारंगीचा टेप मानकुळे व बहिरीचा पाडा या परिसरात मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकाप नेते अनिल पाटील, सिद्धनाथ पाटील, सुशील पाटील व ॲड. भोलानाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल पाटील, माजी सरपंच सत्य विजय पाटील, माजी सरपंच डॉ.मनोज पाटील, माजी सरपंच सिद्धनाथ पाटील, नंदकुमार पाटील, मंगल पाटील, सुभाष पाटील, विक्रम पाटील, भरत पाटील यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खारेपाट विभाग काँग्रेस अध्यक्ष ॲड. भोलानाथ पाटील व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माणकुळ्यात शेकापच्या प्रचाराचा शुभारंभ
