पाण्यासाठी शेकापची एमजीपीवर धडक

घोषणाबाजीने महामार्ग दणाणला
पेण | प्रतिनिधी |
हेटवणे,शहापाडा पाणी योजनेचे पाणी पेण तालुक्याला मिळावे,यासाठी या योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी मंगळवारी पेण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी पाणी आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे,लाल बावटे की जय अशा घोषणांनी सारा महामार्ग दणाणून गेला.मोर्चाची तातडीने दखल घेत एमजीएमतर्फे 31 मार्चपर्यंत योजनांची सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.
माजी आम.धैर्यशील पाटील,जि.प.सभापती अ‍ॅड.निलिमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकापचे कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
सकाळी 11 च्या सुमारास शेकापचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने वाशी नाका येथे जमल. त्यानंतर सर्व कार्यकर्ते शिस्तबध्द लाईनेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय वाशी नाका पेण येथे कार्यकर्ते धडकले. तालुका चिटणीस संजय डंगर यांनी प्रास्ताविक केले. आणि मग आमदार धैर्यशील पाटील यांनी हेटवणे, शहापाडा पाणी योजनेबाबत इथंमबुत माहिती दिली. खारेपाटातील जनतेने निधी आणण्यासाठी घेतलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून या आंदोलनाची रुपरेषा आखण्यात आली. अशी ही माहिती दिली. यावेळी जमलेल्या धरणे आंदोलनाच्या माता भगिनींनी जोरदार घोषणा बाजी केली.
यावेळी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे(हरी ओम), अरुण शिवकर, मा. नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, डी.एम. म्हात्रे, लाल बिग्रेड अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, नगरसेवक संतोष पाटील यांनी आपले विचार व्यासपीठावरुन मांडले तर जेष्ठ नेते अरुण शिवकर यांनी 2016 च्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे तपशिल जनतेसमोर मांडून 29 कोटी 38 लाख ए वढी मोठी निधी कशी मिळाली व धैर्यशील पाटील यांनी कसा प्रयत्न केला. याविषयी माहिती देत हा खारेपाटाचा पाणी प्रश्‍न न सुटल्यास कासू विभागातील 3 हजार महिलांचा पांठिबा देऊ असे ही आवर्जून यावेळी सांगितले.
2 वाजल्याच्या सुमारास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत गजबिये हे आपली भूमिका मांडण्यासाठी आंदोलनकर्त्या समोर उपस्थित झाले. त्यांनी ही योजना होण्यामागे का दिरंगाई झाली याविषयी माहिती दिली परंतु आंदोलनकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यावेळी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांना प्रत्येक महिन्याला राहीलेले काम कशाप्रकारे करणार आहात याविषयी तपशिलवार माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर तहसिलदारांना प्रचारण करण्यात आले तहसिलदार खारेपाटाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहेत. अशी भावना मोर्चाकर्त्यांनमध्ये झाल्यामुळे महिला वर्गात तहसिलदार विरुध्द नाराजी स्पष्ट दिसत होती. तसेच तहसिलदारांनकडे येत्या पाणी टंचाई मध्ये खारेपाटातील गावांना पाणी पुरवठा कसा करता येईल याबाबत कोणताच आराखडा तयार नसल्याने देखील आंदोलनकर्ते नाराज झाले.
तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी येत्या दोन दिवसात बैठकीचे आयोजन करुन संबंधित गावांना पाणीपुरवठा कसा करता येईल याबाबत विचार विनिमय करुन टंचाई ग्रस्त गावांसाठी ठोस उपाय योजना करण्यात येईल असे सांगीतले.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी डी. वाय. एस. पी. विभा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पेण पोलीस निरीक्षक, वडखळ पोलीस निरीक्षक आणि दादर पोलीस निरीक्षक यांच्या टिमने चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रांत कार्यालयात बैठक धैर्यशील पाटील
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी तहसिलदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांना सांगितले की, आपण मागितलेली मुदत ही आम्ही कामासाठी देत आहोत. मात्र 31 मार्च पर्यंत हे काम पुर्ण झाले पाहिजे. काम पुर्ण झाल्यास अधिकारी वर्गांचा जाहिर सत्कार केले जाईल. तसेच पुढील पाणी वितरणासाठी देखील लागणार्‍या निधीची उपलब्धता करुन दिली जाईल यासाठी 11 एप्रिल रोजी प्रांत कार्यालयावर बैठकीचे आयोजन केले जाईल. मात्र 31 मार्चला ही योजना पुर्ण झाली नाही तर माझी पोलीस खात्याला विनंती असेल,जो आम्ही लढा 11 एप्रिलला प्रांत कार्यालयावरुन पुकारु त्याला तुम्ही विरोध करणार नाहीत. कारण आज मुदत देऊन जर आम्हाला फसविले तर मग आमचे आंदोलन हे तीव्र असेल,असा इशाराही त्यानी दिला.

31 मार्चला योजना पूर्ण होणार – कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्याकारी अभियंता चंद्रकांत गजबिये यांनी सांगितले की, पाहिल्या ठेकेदारानी 40 टक्के पर्यंत काम पूर्ण केले आहे. नंतर त्यांनी कामात कामचुकारपणा केल्याने त्याचे काम काढून आपण चार महिन्यापुर्वी नवीन ठेकेदार नियुक्त केले आहे. गेल्या चार महिन्यात त्यांनी 25 टक्के काम पूणर्र् केले आहे. आतापर्यंत एकूण 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात हे काम युध्द पातळीवर करुन 31 मार्च 2022 ला या योजनेचे काम पुर्ण केले जाईल,असे आश्‍वासित केले.

Exit mobile version