| सोलापूर । प्रतिनिधी ।
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब करांडे यांचे शनिवारी (दि.13) निधन झाले आहे.
पायाला गँगरीन झाल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बाबा करांडे हे 2007 ते 2012 दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य होते, यापूर्वी सलग पाच वर्ष ते लेबर फेडरेशनचे चेअरमन राहिले होते. सध्या ते लेबर फेडरेशनवर संचालक होते. सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. जिल्हा परिषद चालक यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी लोटवाडी ता. सांगोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.