। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी पोयनाड येथील ना.ना. पाटील हायस्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, प्रकाश म्हात्रे आदींनी मतदानाचा हक्क बजावला.





