म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुका कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष शेकापचे जेष्ठ नेते, दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक,कणघर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच म्हणून राष्ट्रपती पदक मिळविणारे विद्यमान सरपंच श्रीपत केरू धोकटे (वय 78) यांचे रविवारी (2 जानेवारी) रात्री साडेअकरा वाजता महाड येथ निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,4 मुले, एक मुलगी,नातवंडे असं परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त सर्व पक्षीय मान्यवरांनी धोकटे परिवाराचे सांत्वन केले.