कळंबमध्ये शेकापची प्रचारात आघाडी

| नेरळ | प्रतिनिधी |
कळंब ग्रुपग्रामपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. थेट सरपंच पदाचे उमेदवार शेकापचे प्रमोद कोंडीलकर यांनी महाविकास आघाडीचे माध्यमातून ग्रामपंचायत जिंकण्याच्या दृष्टीने आगेकूच सुरू केली आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेकाप कडून थेट सरपंच पदासाठी माजी सरपंच प्रमोद कोंडीलकर यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. 13 सदस्य पदांच्या जागांसाठी ही निवडणूक होत असून थेट सरपंच आणि 13 जागांवर महाविकास आघाडी कडून जोरदार आघाडी प्रचाराच्या पहिल्या फेरीत घेण्यात आली आहे.त्या ठिकाणी कळंब, गरूडपाडा, मिरचुल वाडी, भागुची वाडी या सर्व भागात प्रचार महा विकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी जोरदार आघाडी घेतली आहे.

शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे आणि माजी सभापती नारायण डामसे यांच्या नेतृतत्वाखाली विभाग चिटणीस पांडुरंग बदे,माजी सरपंच कृष्णा बदे, हनुमान बदे, पंढरीनाथ बदे, पक्षाचे युवक अध्यक्ष महेश म्हसे, पक्षाचे अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव, कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य धर्मा निरगुडे, तसेच अनिल जोशी, ग्रामपंचायत सदस्य नीलम ढोले आदी प्रमुख तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे.

13 सदस्य असलेल्या कळंब ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच प्रमोद कोंडीलकर यांच्या जोडीला सदस्य पदासाठी विजय नारायण बदे,निर्मला निरगुडे, रेश्मा रमेश बदे, प्रकाश निरगुडे, संतोष मोडक, ताईबई पारधी, नरेश निरगुडे,सुगंधा माळी, शिफा खान, राहुल परदेशी, रेवता ढोले हे उमेदवार रिंगणात आहेत. त्यात माजी सरपंच रेवता ढोले, विद्यमान उपसरपंच राहुल परदेशी हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Exit mobile version