शेकाप मसाला दूध वाटप उपक्रम

। पनवेल । वार्ताहर ।

शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्यावतीने 31 डिसेंबर रोजी कळंबोली येथे सरत्या वर्षाला निरोप देताना मसाला दूध वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आले.

31 डिसेंबरच्या दिवशी अनेक जण मद्यपान करून वाहन चालवत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये आणि कधीही मद्य पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहन वारंवार करण्यात येते. यादरम्यान, 31 डिसेंबरच्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्यावतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version