राष्ट्रवादीने मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले

शेकाप चिटणीस रमेश मोरे यांचा घणाघात
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी
माणगाव | प्रतिनिधी |
रायगडात राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवरुन शेतकरी कामगार पक्षाने आवाज उठविला असून, पूरग्रस्तांसाठी आलेली मदत अंगणवाडी सेविकांना करणार्‍या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा केली असून,मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या सुनिल तटकरे युवा प्रतिष्टानच्या कार्यकर्त्याना सहकार्य करणार्‍या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी जोरदार मागणी माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी केली आहे.
गांधी जयंतीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी माणगाव येथील कुणबी भवन येथे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे याच्या नावे असलेल्या सुनील तटकरे युवा प्रतिष्टान तर्फे अगंणवाडी सेविकांना साहित्य वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये जे मदत वाटप केले त्यावर सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान , पुरग्रस्तांसाठी मदत या नावाचे लेबल तसेच्या तसे लावलेल्या अवस्थेत आढळले. त्या सदंर्भात माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी माणगाव मध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मदतीचा पर्दाफाश केला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये रमेश मोरे यांनी सर्व साहित्याचे किट खोलून त्यामधील साहित्यही पत्रकारांना दाखवले. त्यामध्ये स्वेटर, चादर, फेसवॉश, साबण, वॉशिगं पावडर, मग, बालदी, स्टुल असल्याने सदर साहित्य हे पुरग्रस्तांसाठीचे आहे. तसेच किटपिशवी वरील सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान-पुरग्रस्तांसाठी मदत चे स्टीकर ही दाखवले. हे सर्व साहित्य राष्ट्रवादी ने व सुनिल तटकरे युवा प्रतिष्टान ने गोडावून मध्ये ठेऊन त्याच्या वापर पक्षवाढी साठी गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केला, असा आरोप मोरे यांनी केला आहे.
महाड,पोलादपूरमध्ये आलेल्या पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी अनेक सामाजिक संस्था,कंपन्यांकडून हे साहित्य जमा करण्यात आले होते.त्यातील बरेचचे साहित्य हे गोदामातच पडून होते.त्याचे वाटपही पूरग्रस्तांना करण्यात आलेले नाही.तेच साहित्य अंगणवाडी सेविकांना करण्यात आल्याचे मोरे यांनी प्रसारमाध्यमांच्या नजरेस आणून दिले. यावेळी रमेश मोरे याच्यांसह या पत्रकार परिषदेत शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, राजिप सदस्या आरती मोरे, मोर्बा माजी सरपंच दिनेश गुगळे, सुरवचे माजी सरपंच बळीराम खडतर,निनाद मोरे,योगेश मोरे आदी उपस्थित होते.

राज्यपाल,मुख्यमंत्र्यांना भेटणार
या संदर्भात आपण मुख्यमंत्री व राज्यपालांना भेटून राजीनाम्याची मागणी करणार राज्यपालांना या सदंर्भात लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पालकमंत्री अदिती तटकरे याच्यां राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे रमेश मोरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी मध्ये एकत्र असलो तरी सहकारी पक्ष जिते चुकतो ते चुकीचच आहे. 22, 23 जुलै रोजी रायगड मध्ये आलेल्या पुरग्रस्तांची क्रुर चेष्टा राष्ट्रवादी केल्याने आपण पालकमत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली
रमेश मोरे,शेकाप चिटणीस

Exit mobile version