| पाताळगंगा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सावरोली जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जयवंत पाटील, तसेच डमी उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, त्यांच्याकडून चौक ब्राह्मण आळी येथे प्रचार रॅलीमध्ये परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दर्शवला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, सावरोली जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्ष सक्रिय असून त्याचा लाभ निश्चितच परिवर्तन विकास आघाडीला होणार असल्याचे जयवंत पाटील यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले. सावरोली जिल्हा परिषद उमेदवार संतोष बैलमारे, पंचायत समिती वाशिवली पुनम म्हात्रे व सावरोली प्रमिला पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वानिवली, कोपरी, कोपरी वाडी, ब्राम्हण आळी, तुपगाव मोहल्ला, तुपगाव, चौक पाली या गावातील प्रत्येकांच्या घरी जाऊन घड्याळ व मशाल या चिन्हावर बटण दाबुन भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उत्तम भोईर, जयवंत पाटील, सुनिल थोरवे, चंद्रकांत पाटील, राजेश पाटील, जयेश पाटील यांच्यासह शेकाप कार्यकर्त्यांनी केली.
शेकापचा ‘परिवर्तन विकास’ला पाठिंबा
