एसटी कामगारांच्या संपाला शेकापचा पाठिंबा

| उरण | वार्ताहर |
राज्यभर एसटी कामगार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्या व एसटीचे विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी उरण आगारात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने कामगारांना पाठिंबा आहे, असे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, एसटी कामगार तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. संसार, मुले, आईवडील यांचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्‍न आहे. वाढीव पगारवाढ व एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे जेणेकरून कामगारांना न्याय मिळेल. आपल्या न्याय्य मागण्यांबाबत उरण तालुका शेकाप आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी त्यांनी दिली. यावेळी तालुका सहचिटणीस यशवंत ठाकूर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, शहर अध्यक्ष नयना पाटील, चाणजे उपसरपंच प्रदीप नाखवा, नारायण पाटील उपस्थित होते.

Exit mobile version