| पेण | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी नुकतीच पेणमध्ये भेट दिली. यावेळी नगरविकास आघाडीचे उमेदवार संजय म्हात्रे आणि सुजाता डाकी यांना शेतकरी कामगार पक्षाचा जाहिर पाठींबा आहे. त्यामुळे संजय म्हात्रे व सुजाता डाकी यांना निवडून द्यायचे आहे, असे आदेश जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. यादरम्यान, संजय म्हात्रे यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गुरूनाथ मांजरेकर, माजी नगरसेवक प्रकाश शिंगरूत, गणेश पवार, नरेश गुजर, रविंद्र जाधव, सिद्धार्थ म्हात्रे आदी उपस्थित होते.







