माणगावमध्ये विकासकामांत शेकाप अव्वल

तालुका चिटणीस रमेश मोरे यांचा दावा
विविध विकासकामांचा प्रारंभ
माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील मोर्बा जिल्हापरिषद गटातील तसेच खरवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचा शुभारंभ शेतकरी कामगार पक्षामार्फत शुक्रवार दि.15 ऑक्टोबर 2021 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्याहस्ते व विविध मान्यवर,कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी शेकाप हाच विकासकामांना प्राधान्य देणारा अव्वल पक्ष असल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले.
मोर्बा जिल्हा परिषद गटात मागील पाच वर्षात आपण पाच कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याचा दावा तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना केला.यापैकी बरीचशी कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगतीपथावर असून काही कामांचा शुभारंभ सुरु करण्यात आला असल्याचे मोरे यांनी सांगितले.
माणगाव तालुक्यातील मोर्बा जिल्हा परिषद गटातील चांदोरे गावातील राजिपच्या सेस फंडातून 5 लाख रुपये निधीचा मंजूर झालेल्या कुणबी आळीतील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन तसेच 3 लाख रुपये मंजूर निधीतील सभागृहाच्या शेजारी असणारा साकव व संरक्षक भिंत यांचे भूमिपूजन तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्याहस्ते तसेच गाव अध्यक्ष,देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश गुगळे,युवानेते नितीन वाघमारे,विलास मोरे,दिनेश लोखंडे,बापू लोखंडे,कुणबी समाज बांधव आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.तसेच चांदोरे कुणबी समाज ग्रुप क्र.5 सभागृहाच्या जिन्याचे भूमिपूजन तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या हस्ते करण्यात येऊन याठिकाणी समाजाच्या सामाजिक सभागृहात कुणबी मेळावा संपन्न झाला.
यावेळी तालुका चिटणीस रमेश मोरे, माजी सरपंच दिनेश गुगळे, बोरघर कुणबी समाज ग्रुपचे खजिनदार नितीन वाघमारे,विलास मोरे, चिंचाळकर गुरुजी, चिविलकर,बापू लोखंडे,दिनेश लोखंडे यांच्यासह चांदोरे,रानवडे,नळेफोडी, निवाची नळेफोडी,वडघर,गोवेले आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
हाने सुरव येथे रायगड जिल्हा परिषदेच्या 15 व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उदघाटन सायंकाळी 7 वा.तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी माणगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता बक्कम,साले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय बक्कम,नथुराम मोरे,विलास मोरे,योगेश मोरे,कल्पेश मोरे,समीर मोरे,बळीराम खडतर,खरवलीचे माजी उपसरपंच नथुराम आडीत,महादेव लहाने,काशीराम लहाने,दिलीप लहाने,ग्रामपंचायत उपसरपंच समीर लहाने,पोलीस पाटील पांडुरंग लहाने,रामू लहाने, रामचंद्र लहाने,कमलाकर अर्बन,राजू करकरे,तुषार करकरे,प्रशांत लहाने आदी मान्यवरांसह पक्षाचे कार्यकर्ते ,ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुका चिटणीस रमेश मोरे यांन लहाने सुरव येथील सभागृहाला जागा देणार्‍या द्रौपदी बाई उभारे यांना मनापासून धन्यवाद दिले.

Exit mobile version