शहर चिटणीस शेखर पाटील यांचा विश्वास
। उरण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाची आगामी उरण नगरपालिका निवडणूक संदर्भात सभा कोटनाका येथील पक्ष कार्यालयात घेण्यात आली. उरण नगरपालिका निवणुकीत शेतकरी कामगार पक्ष सज्ज असून आपली ताकद या निवडणुकीत दाखवून देणार आहोत असे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उरण नगर पालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. शेकापची ताकद काही प्रभागात आहे, तर शेकापची काही प्रभागात निर्णायक मते आहेत. यामुळे येणार्या निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, संभाव्य उमेदवार यांनी कामाला लागावे. आ.बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूका लढविणार आहोत यासाठी शहरातील प्रभागात बैठका घेऊन संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी एकजूट होऊन काम करणार आहोत असे उरण शहर चिटणीस शेखर पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल म्हणाले की, कार्यकर्त्यांनी शहरातील प्रभागांचा आढावा घेऊन शेकापची ताकद असलेल्या प्रभागात उमेदवार निवडून आणण्यासाठी कटिबद्ध रहावे. तसेच उरण नगरपालिका निवडणूकीत शेकापचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे प्राधान्य देऊन उरण नगरपालिकेत लाल बावटा फडकविल्यशिवाय रहाणार नाही असे प्रतिपादन केले. यावेळी नवनिर्वाचित सभापती समिधा निलेश म्हात्रे यांचा सत्कार शहराच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी केला. या बैठकीसाठी उपसभापती महादेव बंडा, सभापती नरेश घरत, ज्येष्ठ नेते काका पाटील, सहचिटनिस यशवंत ठाकूर, युवक अध्यक्ष मयूर सुतार, महिला आघाडी अध्यक्ष सीमा घरत, शहर अध्यक्ष नयना पाटील, सुप्रिया म्हात्रे, प्रियंका म्हात्रे, रेखा घरत, नुतन पाटील, प्रदीप नाखवा, नारायण पाटील, चिंतामण गायकवाड, जितेंद्र ठाकूर, आनंत घरत, राजेश तांडेल, लहू शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.