। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा मुरुडमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा मेळावा (दि.27) मार्च रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे. कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी केले आहे.
मुरूड-जंजिरामधील हिंदू एज्युकेशन सोसायटी (हिंदू बोर्डींग) विश्रामबागेच्या समोर हा मेळावा होणार आहे. यावेळी माजी आ. पंडीत पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, मुरुडचे शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या या मेळाव्यात मुरुडमध्ये पक्षवाढीसाठी ध्येय धोरणे ठरणार असून, आ. जयंत पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. या मेळाव्याची तयारी सुरु झाली असून, मुरुडमधील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.