सर्वक्षेत्रात शेकापचे योगदान- चित्रलेखा पाटील

रेवदंडा येथे शेकाप चषक क्रिकेट स्पर्धा

| कोर्लई | राजीव नेवासेकर |

केवळ राजकारण न करता कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात शेकापचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रविवारी (दि.26) रेवदंडा येथे केले.


अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्‍वर मैदान येथे चित्रलेखा पाटील पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक- 2023 या शेकाप व सहकारी मित्र यांच्यातर्फे तीन दिवसीय टेनिस क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या दिवशी आयोजित कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या.

शेतकरी कामगार पक्ष हा प्रत्यक्षात काम करणारा पक्ष असून कोविड महामारी असो, वादळ असो, सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप, महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन तसेच शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात पक्षाचे मोलाचे योगदान आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या महिन्यात तीन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

चित्रलेखा पाटील, महिला आघाडी

यावेळी अलिबाग पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, ग्रामपंचायत सदस्य राजन वाडकर, संतोष मोरे, संदीप खोत, माजी सरपंच विजय चौलकर, मुजफ्फर मुकादम, राजू चुनेकर, निलेश खोत, शरद वरसोलकर, सुभाष शेळके, विक्रम सुर्वे, श्रीकांत भोईर, दुषांत झावरे, दानेश गोंडेकर, आयोजक सागर विचारे, रिझवान पटवी, संकेत, जोयशी, राहुल गणपत, विकी सुर्वे, दिलीप भोईर, इकबाल मुकादम, यासीन मुकादम, रोशन भोईर, निलेश खोत, अ‍ॅड. रोहित भोईर यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अ‍ॅड. रोहित भोईर यांच्याहस्ते चित्रलेखा पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिकेट स्पर्धेसाठीचे प्रथम क्रमांकाचे 50 हजारांचे बक्षीस चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते रोख देण्यात आले तर स्पर्धेसाठी सर्व चषक संदीप खोत यांच्या कडून देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक विशेष परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version