| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे लोकसभा व विधानसभा आगामी निवडणुकांसंदर्भात पूर्वनियोजन बैठकीचे बुधवारी (दि.7) दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, माणगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. याबबतची माहिती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिली.
या बैठकीला शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीची जोरदार तयारी तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आली असून, बैठकीला पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रमेश मोरे यांनी केले आहे.