| अलिबाग I प्रतिनिधी ।
महाळुंगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाच्या निलम धर्मेश वारगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. निलम वारगे या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. कमी कालावधीत त्यांनी आपल्या कामातून राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे. सलग दोन वेळा सदस्य म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. ग्रामपंचायत महाळुंगे येथे ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्या निलम धमेॅश वारगे यांची निवड करण्यात आली आहे.
शेकापच्या निलम वारगे उपसरपंचपदी
