| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून कर्जत तालुका अध्यक्षपदी कोदीवले गावाचे पोलीस पाटील शेखर तरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार कमिटीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मधुकर डायरे आणि महिला जिल्हा अध्यक्ष सविता गायकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये नवनिर्वाचित कमिटीची उपस्थित सर्वांच्या मते नियुक्ती करण्यात आली. कर्जत तालुक्याची नवीन कमिटी स्थापन करताना तालुक्यातील सर्व गाव कामगार पोलीस पाटील यांची उपस्थित होती. त्यातून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ कर्जत तालुका अध्यक्ष पदी शेखर तरे पाटील (पोलीस पाटील कोदिवले) याची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून कोल्हारे बोपेले गावाचे पोलीस पाटील संतोष जाधव पाटील तर महिला उपाध्यक्षा सरिता शेळके पाटील ( डिकसल), कार्याध्यक्ष म्हणून प्रदीप गायकर पाटील (पाली), सचिव म्हणून जनार्दन पारधी पाटील ( झुगरेवाडी), खजिनदार म्हणून चंद्रकांत जाधव पाटील (आंत्रड नीड), सह खजिनदार म्हणून स्वाती म्हसे पाटील ( वारे)आणि सल्लागार म्हणून दत्तात्रय भोईर पाटील (पोही), त्रिंबक असवले पाटील (अंभेरपाडा), भरत पाटील ( बोरगाव), तर सदस्य म्हणून गणेश भोईर पाटील कुंभे, अनिल बारणेकर पाटील (दहिवली), विजय राणे पाटील (देवपाडा) यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा सन्मान नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी केला.







