| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील चिकणी (देऊर) येथील रहिवासी शेवंताबाई भागोजी देवरे (97) यांचे सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. नागोठणे विभाग सहकारी भात गिरणीचे संचालक सुरेश भागोजी देवरे यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत शेवंताबाई देवरे यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी के.टी. बंधार्याजवळील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवरे यांचे सगे-सोयरे, नातेवाईक, नागोठणे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चिकणी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. शेवंताबाई देवरे यांच्या पश्चात गोविंद देवरे, बाजीराव देवरे, किसन देवरे, पांडुरंग देवरे, अर्जून देवरे, सुरेश देवरे असे पाच मुले व एक मुलगी अनुसया शिंदे यांच्यासह सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी उध्दर – पाली येथे होणार असून, उत्तर कार्य विधी रविवार दि. 8 डिसेंबर रोजी चिकणी (देऊर) येथील राहत्या घरी होणार असल्याचे देवरे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
शेवंताबाई देवरे यांचे निधन
