अंकुश जाधव यांना शिक्षकरत्न पुरस्कार

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील निवी गावचे अंकुश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांना दहावेळा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अ.भा.म. सा.परिषद मुंबई प्रदेश अंतर्गत मध मुंबई विभाग आयोजित 4 थे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलनात अंकुश नथुराम जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. जाधव हे शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली 16 वर्षे कार्यरत आहेत. ते एक दिव्यांग शिक्षक असून अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक, कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहे.

Exit mobile version