शेतकरी कामगार पक्षाचे शिलेदार ‘शिट्टी’ या चिन्हावर लढणार

| पनवेल | प्रतिनिधी |

20 नोव्हेंबर रोजी होणार्‍या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार हे शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा जरी घटक पक्ष असला तरीसुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील (पनवेल), चित्रलेखा पाटील (अलिबाग), अतुल म्हात्रे (पेण), प्रीतम म्हात्रे (उरण), डॉ. बाबासाहेब देशमुख (सांगोला) हे सर्व उमेदवार शिट्टी या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. याचबरोबर “लढेंगे और जितेंगे’’ हे घोषवाक्य घेऊन ते मैदानात उतरले आहेत, असे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये सांगितले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत चिन्ह खटारा हे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यामुळे काही काळ शेतकरी कामगार पक्षामध्ये चिन्हाबाबत वेगवेगळ्या चर्चा करण्यात आल्या होत्या. याबाबत काही लोकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. मात्र, आता या सर्वावर पडदा पडला असून, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व उमेदवार हे शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

Exit mobile version