| खोपोली | प्रतिनिधी |
शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या चौकापासून रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे रूंदीकरण स्मारकाची जागेतून होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, शिवप्रेमी, नगरपालिका बांधकाम अधिकारी, जे.एम.म्हात्रे एफ्राटेक्चर अभियंता यांच्या समवेत गुरूवार दि.30 नोव्हेंबर रोजी चर्चा करीत उपस्थितांच्या सहमतीने रस्ता रूंदीकरणासाठी स्मारकाच्या बाजूची जागा देण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र फक्के, हरीश काळे, अमोल शहाणे, संजय दळवी, राकेश चव्हाण, सोनु परदेशी, लखन पवार, अशोक ठकेकर, संतोष मोहिते, खोपोली नगरपालिकेचे बांधकाम उपअभियंता नामदेव लगाडे, जे.एम.म्हात्रे एफ्राट्रेक्चर अभियंता उपस्थित होते. शिळफाट्यावरील ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि बांधकाम अभियंता यांची सकारात्मक घडवून आणल्याबद्दल पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांचे कौतुक होत आहे.







