अलिबाग पर्यटन वाढीसाठी शिंदेशाही सरसावली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग से आया हे क्या? अस बोलणार्‍यांना चपराक देण्यासाठी आता शिंदेशाही पूढे सरसावली आहे. कैक मराठी कलाकार अलिबागला येऊन चित्रीकरण करीत आहेत. त्यातच अलिबागच्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी शिंदेशाहीचा वारसा पुढे नेणारे बिग बॉस 3 फेम मास्टरमाईंड डॉ.उत्कर्ष शिंदे यांनी अलिबागचे सौंदर्य, समुद्र किनारे, किल्ले इत्यादीवर आधारित एक मस्तीने भरलेल गाणे तयार केले आहे. यामधून अलिबागच्या पर्यटनात अधिक वाढ होणार असल्याचा विश्‍वास उत्कर्ष शिंदे यांनी व्यक्त केला.

तालुक्याला लाभलेला निसर्गरम्य असा समुद्र किनारा व इकडचे अलौकिक सौंदर्य अलिबाग फिराया जाऊ या गाण्याची निर्मिती बिग बॉस मराठी-3 फेम उत्कर्ष शिंदे यांनी केली आहे. उत्कर्षने हे गाणे लिहून संगीतबद्ध केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून अलिबागचे नैसर्गिक सौदर्य प्रत्येक माणसाच्या मनात रुजावे यासाठी उत्कर्ष शिंदे यांनी गाण्याची निर्मिती केली आहे. सोशल मीडिया पेजवर उत्कर्ष शिंदे नव्या कार्यक्रमात नव्या गाण्यात तर काही चित्रपटातही झळकणार असल्याच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. या पोस्टना आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये मेन्शन करत, उत्कर्षने हे मान्य केले आहे. की तो लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

Exit mobile version