शिर्डीचे प्रसादालय उद्यापासून सुरु

शिर्डी | प्रतिनिधी |

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डीतील बंद असलेले प्रसादालय शुक्रवारी भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिर्डीत दर्शनासाठी जाणार्‍या साईभक्तांना प्रसादालयात भोजन करता येणार आहे.

Exit mobile version