। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गावदेवी बाहे आयोजित क्रिकेट सामन्यात रॉयल किंग शिरवली संघ अंतिम विजेता ठरला आहे. अंतिम सामना शिरवली व धाकसुद चिल्हे यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर रॉयलकिंग शिरवली संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर चिल्हे संघाला दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक गावदेवी बाहे हा संघ मानकरी ठरला. उत्कृष्ट सामनावीर शिरवली संघाचा संकेत लहाने स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज शुभम भोईर, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून चिल्हे संघाचा संघाचा नितेश कोंडे यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.
खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने गावदेवी बाहे यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा पत्राच्या किनार्यावरील प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी लिंबाजी थिटे, क्रीडाप्रेमी कपिल बामणे, देवकान्हे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र राऊत,मोरया डी जे साउंड सर्व्हिसचे मालक ज्ञानेश्वर थिटे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला देवकान्हे ग्राम पंचायतीचे सरपंच रायगड भूषण लोकशाहीर वसंत भोईर, उपसरपंच सुरज कचरे, मराठी उद्योजक नारायनशेठ कान्हेकर, पत्रकार रायगड भूषण डॉ.शामभाऊ लोखंडे, माजी सरपंच राजेश सुटे, कपिल बामणे, रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, ग्रामपंचायत सदस्य,रविंद्र राऊत, विलास थिटे, अशोक थिटे,मंगेश चव्हाण,दयाराम भोईर, मंगेश ठाकूर, प्रदीप गोविलकर,विश्वास माठळ आदी मान्यवरांनी सदिच्छा दिल्या. तसेच कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी प्रदिप गोविलकर, अनिल जाधव, जगदीश थिटे, शिवाजी साळसकर, मनोज थिटे, रोशन ठाकूर, विजय नाकटे, सचिन बाळू थिटे, सूरज साळसकर, विश्वास माठल, रोहित देवकर, मनेश थिटे, प्रतीक थिटे, स्वप्नील चव्हाण, किरण जाधव, राकेश रमेश जाधव, रोशन मोरे, सागर सपकाळ, ज्ञानेश्वर थिटे व मंडळाचे पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.