उरणमधील शिवस्मारक होणार 1 डिसेंबरपासून खुले

। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्राची शान ठरू पाहणार्‍या उरण येथे जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य-दिव्य असे 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी 1 डिसेंबरपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.
उरण येथे जेएनपीटीने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे मेमोरियल म्युझियम शिवस्मारकाचे अडीच वर्षांपूर्वी लोकार्पण करण्यात आले आहे. विविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक भव्य दिव्य स्मारकाची मागील अडीच वर्षांपासून देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिक आदी सर्वानाच मोठी प्रतीक्षा लागून राहिली होती. कोव्हिड काळात बंद ठेवण्यात आलेले 20 मीटर उंचीचे बहुचर्चित शिवस्मारक पर्यटकांसह सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. उभारण्यात आलेल्या तळमजल्यावर 480 चौरसमीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे. या सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरूम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

Exit mobile version