माथेरान पतसंस्था निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनल विजयी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान नगरपरिषदेची लिटमस टेस्ट शिवराष्ट्र पॅनलने जिंकली. माथेरान नागरी पतसंस्थेवर शिवसेना – राष्ट्रवादी यांच्या शिवराष्ट्र पॅनल विजयी झाले असून, भाजप काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या पिसारनाथ पॅनलचा धुव्वा उडाला आहे. आगामी काळात होणार्‍या नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगित तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते.

1939 मध्ये भाऊसाहेब राऊत आणि विठ्ठलराव कोतवाल यांनी पुढाकार घेवून माथेरान नागरी पतसंस्थेची स्थापना केली होती. 20कोटींची आर्थिक उलाढाल असलेली ही पतसंस्था माथेरान मधील जनतेची आर्थिक नाडी समजली जाते. पतसंस्थेच्या सर्व 13 जागांवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे शिवराष्ट्र पॅनलने बाजी मारताना मोठा विजय मिळविला. सर्वसाधारण गटातील आठ, महिला राखीव दोन, अनुसूचित जाती जमाती एक, भटक्या जमाती एक आणि नागरिकांचा मगासप्रवर्ग एक अशा 13 जागांवर शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळें आगामी काळात होणार्‍या पालिका निवडणुकीची रंगीत तालीम किंवा लिटमस टेस्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जिंकली आहे.

विजयी उमेदवार –
सर्वसाधारण गट –
विजय कदम 517, चंद्रकांत काळे 422, विवेक चौधरी 520, कुलदीप जाधव 523, सचिन दाभेकर 469, नितीन शेळके 445, अजय सावंत 548, विजय सावंत 415, नागरिकांचा मागासप्रवर्ग- नासिर शारवान 504, भटक्या विमुक्त जाती– रामचंद्र ढेबे 492, महिला सर्वसाधारण- विनंती घावरे 515, स्वाती मोरे 497, अनुसूचित जाती जमाती- गजानन आबनावे 522.

पराभूत उमेदवार –
पराभूत उमेदवार-
दिलीप कदम 346, ज्ञानेश्‍वर बागडे 362, सलीम मुजावर 342, मनोहर रांजणे 304, नितीन शाह 374, संदीप शिंदे 396, सुनील शिंदे 398, अरविंद शेलार 333, चंद्रकांत सुतार 401, संतोष आखाडे 409, प्रतिभा घावरे 394, अंजली येरफुळे 340, सचिन काळे 375

Exit mobile version