गोवंशाची हत्या प्रकरणी शिवसेना आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

| मुरूड । प्रतिनिधी ।

मुरूडमध्ये गोवंशाची हत्या हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो. तरी गोवंशाची हत्या करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी यासाठी मुरूड शिवसेना आक्रमक पवित्रा घेऊन मुरुड पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी मुरुड शहर प्रमुख आदेश दांडेकर यांनी पोलीस उपनिरीक्षक खुतूजा शेख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशांत कासेकर, विजय वाणी, कुणाल सतविडकर, अशिल ठाकुर, मोहन पाटील, प्रतिक उमरोटकर, यश माळी, रुपेश जामकर,राजेश मुळेकर उपस्थित होते.

दि. 25 व 27 ऑक्टोबर रोजी गारंबी व पारगान गावाच्या कच्च्या पायवाटेवर अज्ञात समाज कंटकांनी गोवंशाची कत्तल केली होती. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याआधी नांदगाव दांडा, काशिद, बारशीव परिसरात गोवंशाची हत्या करुन अशाप्रकारे गोवंशाची हत्या करुन त्यांचे अवशेष फेकून दिले होते. सदर घटना या सलग पाचवेळा घडल्या आहेत. स्थानिकांची गुरे चोरीला जात आहेत. हे प्रकार रात्रीच्या अंधारात होत असल्याने शेतकरी, गुरे मालक भयभीत झाले आहेत. यामुळे तालुक्यातील नागरिक व ग्रामस्थांनी संताप व्यक्तकेला आहे. त्यामुळे मुरुड शिवसेना आक्रमक पवित्रा घेऊन या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे.

Exit mobile version