शिवसेना-भाजपचा कलगीतुरा सुरुच

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील आरोपांचा कलगीतुरा बुधवारीही अखंडित राहिला.खा.संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट दिल्लीतून प्रत्युत्तर दिले.तर या वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला.या आरोप,प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राचे डोके मात्र गरगरायला लागले.

सोमय्यांचे पुन्हा राऊतांवर आरोप
भाजप, शिवसेनेतील आरोपांचा सिलसिला सुरुच असून,भाजप नेेते किरीट सोमय्यांनी बुधवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत शिवसेना खा.संजय राऊत,रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली.
कोर्लई येथे ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल केला सोमय्यांनी केला आहे. राऊत्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचं डोकं गरगरलंय, हे सांगायलाही सोमय्या विसरले नाहीत.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. 2008 मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केला.

माझ्याकडे देखील राऊतांची संपूर्ण कुंडलीच आहे. ती मी कधीही बाहेर काढू शकतो हे राऊतांनी लक्षात ठेवावे. राऊत हे काहीही पुरावा नसताना आरोप करत आहोत. – नारायण राणे,केंद्रीय मंत्री

Exit mobile version