ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार; शिवसेनेचे 30 ते 32 नगरसेवक शिंदे गटात

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेला एका मागून एक धक्के बसत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे 66 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता ठाण्या पाठोपाठ नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीनंतर शिवसेनेचे 30 ते 32 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत.

आज रात्री नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हे नगरसेवक भेट घेणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, किशोर पाटकर असे जेष्ठ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार आहेत. यामध्ये ऐरोली मतदारसंघातील जवळपास 90 टक्के नगरसेवकांचा समावेश आहे.
नवी मुंबईत शिसेनेचे 50 नगरसेवक आहेत. त्यामधील 30 ते 32 जण एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आगामी काळात उर्वरित नगरसेवकांना देखील गळाला लावण्याचं काम शिंदे गटाकडून होणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिनसेनेसाठी हा आणखी मोठा धक्का आहे.

Exit mobile version