| तळा | प्रतिनिधी |
शिवसेना शिंदेगटाचे तळा तालुका सहसंपर्क प्रमुख ॲड. चेतन चव्हाण यांनी भाजप खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ॲड. चेतन चव्हाण यांनी नगरसेवक म्हणून निवडून येत शिवसेनेचे गटनेते म्हणून प्रमुख भूमिका बजावली होती. तसेच पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मात्र मध्यंतरी घडलेल्या विविध घडामोडींमुळे ते पक्षापासून दुरावले होते. तसेच पक्षात घुसमट होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाच्या विविध कार्यक्रमापासून अलिप्त होते.अखेर त्यांनी आपल्या शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन भाजपचे खा. धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.







