| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान या गिरीस्थान नगरपरिषदेमध्ये शिवसेना पक्षात सुरू असलेले चढाओढ थांबली आहे. या पक्षातील थेट नगराध्यक्षपदाचे दावेदार शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी आणि शहर संघटक मनोज खेडकर यांच्यातील दावेदारीसाठी सुरू असलेली चढाओढ आमदार महेंद्र थोरवे यांनी यशस्वी मध्यस्थी करून थांबवली आहे. दरम्यान, माथेरानमध्ये नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी चंद्रकांत चौधरी यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असून, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर हे नवीन शहरप्रमुख बनले आहेत.
माथेरानमध्ये शिवसेना भाजप पक्षाकडून आता थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या जागी नवीन शहर प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान शहर संघटक मनोज खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी भाजप माथेरानमध्ये युती म्हणून निवडणूक लढणार असलेल्या जागांची घोषणा करण्यात आली आहे.
माथेरानमध्ये शिवसेनेचे मतभेद मिटले
