परब यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती
रामदास कदम यांचा आरोप
मुंबई | प्रतिनिधी |
परिवहन मंत्री अॅड.अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला असून,शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी परब हेच शिवसेनेसाठी गद्दार असून,त्यांच्यामुळे पक्षाची अधोगती झाल्याचा आरोप त्यांनी केला.तर परब यांनी याबाबत पक्षप्रमुखच निर्णय घेतील असे सुचित केलेले आहे.
परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांच्यामुळेच शिवसेनेची अधोगती सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम पक्षाला मजय महाराष्ट्रफ करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
परब यांचा शिवसेना राष्ट्रवादीत घालण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पक्षांतर्गत होणारी कुचंबणा समोर आणली. अनिल परब यांच्यामुळे कदम यांच्या मुलांनाही नगरपंचायतीसाठी तिकीट डावण्यात आलं. परब हेच खरे सेनेतील गद्दार आहेत. आणि ते सेनेच्या मुळावर उठल्याचा आरोप कदम यांनी केला. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्र असले तरी ते जिल्ह्यात कधीही फिरकत नाहीत. फक्त झेंडावंदनाला हजेरी लावतात. त्यामुळे जिल्ह्यात काय चाललंय, याची त्यांनी जाणीव नाही. रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचं कदम म्हणाले.
मी मरेपर्यंत शिवसैनिक राहिन. मला पक्षातून काढलं तरी मी सेनेची साथ सोडणार नाही. मात्र, मुलांसमोर राजकीय पर्याय आहेत. त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे.
रामदास कदम,शिवसेना नेते
त्यांनी काही म्हणू दे. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्यावर त्याचं उत्तर मी देणार नाही. मी एक शिवसैनिक आहे ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबतची जी काही दखल घ्यायची आहे ती पक्ष घेईल.
अॅड.अनिल परब,परिवहन मंत्री