दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेचा दणदणीत विजय

कलाबेन डोलकरांनी 47,447 मतांनी मारली बाजी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
फेब्रुवारी 2021 मध्ये अपक्ष खासदार मोहन डोलकर यांच्या निधनामुळे केंद्रशासित प्रदेशातील दादरा-नगर हवेली या लोकसभा पोटनिवडणूकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मातमोजणी सकाळी 8 वाजल्यापासुन सुरू होती. या निवडणूकीत शिवसेना, भाजप व काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. अखेर मतमोजणी दुपारी 3 च्या सुमारास संपली. या मतमोजणीत शिवसेनेच्या कलाबेन डोलकरांनी दणदणीत विजया मिळवला आहे. शिवसेनेला एकुण 1,16834 मत मिळाली आहेत. दादरा-नगर हवेली लोकसभा निवडणूकीत कलाबेन डोलकरांनी 47,447 मतांनी बाजी मारली असुन शिवसेनेला विजय मिळवून दिला आहे.

Exit mobile version