नेरळमध्ये रंगला शिवराज्याभिषेक सोहळा

विद्या विकास मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील विद्या विकास मंदिराच्या विद्या विकास मंदिर शाळेची प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलनात छत्रपती शिवाजी महाराज अवतरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी 350 वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त यावर्षी शाळेचे स्नेहसंमेलन त्या धर्तीवर साजरे करण्यात आले.

या स्नेहसंमेलनाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, कार्यवाह अमित जोगळेकर, सदस्य पिंपुटकर, कार्यकारिणी सदस्य दिलीप कवाडकर, अनंता काळे, माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे, माध्यमिक मुख्याध्यापिका शैलजा निकम, प्राथमिक विभाग विनया काकडे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक स्नेहा म्हसे, बालवाडी विभाग मुख्याध्यापिका सीमा दिघे, पालक संघ सहसचिव सचिव गायकवाड आणि प्राथमिक विभाग स्नेहसंमेलन प्रमुख कीर्ती भास्कर दहीवलीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विनया काकडे यांनी केले.

या संमेलनानिमित्ताने शाळेच्या सर्व महिला शिक्षकांनी नऊवारी साडी परिधान करून शिवकाळाची आठवण करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात माझ्या बाबांनी गणपती आणला या गाण्याने झाली. त्यानंतर गणेश वंदना आणि त्यानंतर शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आले. या सोहळ्यात विंचू चावला हे भारुड, ताटी उघडा ज्ञानेश्वर, हर हर शंभो, शहाजी राजे-राजमाता जिजाऊ विवाह सोहळा, गोंधळ सोहळा,छत्रपतींचा जन्म, महाराजांचे खेळ विटी दांडू, बाळ शिवाजी यांचे शिक्षण, मेरे घर राम आये, गोविंद बोलो, स्वराज्याची तोरण, स्वराज्याची प्रतिज्ञा, देवीचा इतिहास, प्रतापगड पराक्रम, पावनखिंड पराक्रम, शिहिस्तेखान फजिती, सुरतेवर हल्ला, पुरंदर तह तयारी, नाटिका पुरंदर वेढा आणि बादशहाच्या हातावर तुरी, तानाजी मालुसरे, शिवराज्याभिषेक सोहळा असा हा सोहळा रंगला होता. या शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version